घरकुल योजना अर्ज- जिल्ह्यात घरकुलांची कामे सुरू – रमाई, शबरी, मोदी आवास योजना
घरकुल योजना अर्ज : रमाई घरकुल आवास योजना, शबरी घरकुल आवास योजना आणि मीदी आवास योजनेअंतर्गत फेब्रुवारी अखेरपर्यंत गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात १० हजार २९१ घरकुलाना मंजुरी देण्यात आली असून, लाभाव्यांकडून घरकुलांची बांधकामे सुरू करण्यात आली आहेत. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या रमाई घरकुल आवास योजना, शबरी घरकुल आवास योजना आणि मोदी आवास योजनेअंतर्गत पात्र लाभाच्यांस घरकुल बांधकामासाठी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. नवीन उषांतील आनेवारी व फेब्रुठारी या दोन महिन्यांच्या कालावधीत संबंधित तीनही आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात १० हजार २९१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली.
घरकुल योजना अर्ज : त्यामध्ये रमाई आवास योजना आणि मोदी आवास योजनेतील घरकुलांना समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांमार्फत आणि शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुलांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्पे अधिका-यांकडून मंजुरी देण्यात आली घरकुल मंजूर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील संबंधित लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी पहिल्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली असून, उपलब्ध अनुदानाच्या रकमेतून संबंधित लाभार्थ्यांकडून घरकुलांची बांधकामे सुरू करण्यात आली आहेत.
घरकुल योजना अर्ज – जिल्ह्यात दोन महिन्यात १०,२९१ घरकुले मंजूर रमाई घरकुल आवास योजना, शबरी घरकुल आवास योजना आणि मोदी आवास योजता या तीन योजनेतर्गत गेल्या जानेवारी फेब्रुवारी अखेरपर्यंत दोन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात १० हजार २९१ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.
Pm Awas Yojana Gramin | प्रधानमंत्री आवास योजना 2023
- अर्ज कोठे करावा?
- घरकुल योजना अर्ज – आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी लाभार्थीने निकषानुसार व परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज संबंधित ग्रामपंचायतीकडे सादर करणे आवश्यक आहे.
- लाभार्थींचे पात्र अर्ज ग्रामपंचायतीकडून संबंधित पंचायत समितीकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येतात.
- कोणत्या योजनेत किती अर्ज आले?
- रमाई घरकुल आवास योजनेत २१४०
- रमाई घरकुल आवास योजनेत फेब्रुवारी अखेरपर्यंत दोन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील लाभाध्यांना २ हजार २४० घरकुले मंजूर करण्यात आली.
- शबरी घरकुल आवास योजनेत ७९८
- शबरी घरकुल आवास योजनेंतर्गत गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभाश्यांना ७९८ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.
- मोदी आवास योजनेत ७३५३
- मोदी आवास योजनेंतर्गत गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील लाभाव्यांना ७ हजार ३५३ घरकुले मंजूर करण्यात आली.
घरकुल योजना अर्ज – योजनांसाठी निकष काय काय असतील?
रमाई घरकुल आवास योजना : या योजनेतर्गत लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, पक्के घर नसावे, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा, वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
शबरी घरकुल आवास योजना : या योजनेत लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा, पक्के घर नसावे. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा, वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असावे.
मोदी आवास योजना : या योजनेतर्गत लाभार्थी इतर मागासवगीय आणि विशेष मागास प्रवर्गातील असावा, पक्के घर नसावे, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा, वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
संबंधित लाभार्थींनी घरकुलाची कामे तातडीने पूर्ण करावी. अशी माहिती
बी. वैष्णवी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी दिली.