1 Rupayat Pik Vima Yojana : शेतकऱ्यांना 1 रुपयात पिक विमा योजना | शासननिर्णय जाहीर,अशी राबवली जाणार Pik Vima योजना

84 / 100
Pik Vima

Pik Vima : 2023-24 या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात शेतकरी बांधवांना एक रुपयात शेतीपिकाचा Pik Vima काढता येणार, अशी घोषणा शासनाच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि यावर्षीच्या आर्थिक बजेटमध्ये देखील एक रुपयात शेती पिकाचा Pik Vima काढता येईल असा समावेश करण्यात आला होता. आणि त्या अनुषंगानेच दि.२३/०६/२०२३ रोजी सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यास मान्यता मिळाली असून त्याबाबतचा शासननिर्णय जाहीर करण्यात आला आहे.

आणि त्यानुसारच राज्यात आता प्रधानमंत्री Pik Vima योजना खरीप हंगाम २०१६ पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार हि योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या संदर्भ क्रमांक १ च्या मार्गदर्शक सुचानांमधील मुद्दा क्र. १३.०१.१० नुसार जर राज्यशासन शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याच्या वाट्याची रक्कम भरणार असेल तर इलेक्ट्रॉनिक, ट्रकींग व नाव नोंदणी सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यानमार्फत विमा हप्त्याच्या ऐवजी किमान १ रुपयाचे टोकन अनिवार्यपणे आकारले जाणार असून, त्या अनुषंगाने मा.वित्तमंत्री महोदयांचे सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता एक रुपयात पिक विमा या योजनेची घोषणा करण्यात आली होती. आणि आता केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्याकरीता वेळोवेळी होणाऱ्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांना मात्र १ रुपया भरून Pik Vima योजनेचा लाभ देण्याकरिता सर्वसमावेशक पिक विमा योजना राबवण्याबाबतच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

राज्यात सन २०२३-२४ च्या अर्थ संकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात Pik Vima योजनेचा लाभ देण्याकरिता, सर्वसमावेशक पिक विमा योजना हि योजना सन-२०२३-२४ पासून राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अशी राबवली जाणार पिकविमा योजना-

सर्वसमावेशक Pik Vima योजना हि अधिसुचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरिता राबविण्यात येत आहे.

 सर्वसमावेशक पिक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता समाविष्ट महत्वाच्या बाबी –
  • (Prevented Sowing / Planting / Germination) जोखमीच्या हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थिती मुळे, पिकांची पेरणी व लावणी न झाल्या मुळे, होणारे नुकसान तसेच,
  • (Mid season Adversity) पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच,
  • पिक पेरणी पासून काढणी पर्येंतच्या कालावधीत नैसर्गिक आग,वीज कोसळणे,गारपीट,वादळ,चक्रीवादळ,पूर,क्षेत्र जलमय होणे,भूस्खलन,दुष्काळ,पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट,
  • (Localized Calamities) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान,
  • (Post Harvest Losses) नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे काढणीपश्यात होणारे नुकसान

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे घटक

  • केंद्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्याने भरावयाचा Pik Vima हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी दीड टक्के, तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के, असा मर्यादित ठेवला आहे. सर्वसमावेशक Pik Vima योजने अंतर्गत सदरचा शेतकरी हिस्स्याचा भार सुद्धा शेतकऱ्यावर न ठेवता शेतकऱ्यांच्या हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्यशासना मार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे खरीप हंगाम २०२३-२४ पासून शेतकऱ्यांना मात्र १ रुपया भरून Pik Vima पोर्टलवर CSC केंद्र, आपले सेवा सरकार केंद्र,सेतू केंद च्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे.
  • सर्वसमावेशक पिक विमा योजना हि योजना खरीप व रब्बी हंगाम २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षाच्या कालावधीत Profit & Loss Model कींवा Cup & Cap Model (80:110) नुसार राबविण्यात येणार आहे.
  • सर्वसमावेशक पिक विमा योजने अंतर्गत नुकसानभरपाई निश्चितीसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पिकांचे सरासरी नुकसान काढतांना भात,गहू,सोयाबीन,व कापूस, या पिकांच्या किमान ३० टक्के भारांकन तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन व पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नात मेळ घालून निश्चित करण्यात येईल.
  • केंद्र शासनाने सादर व वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शक सुचना मधील सर्व अटी व शर्ती सह्भागीदारांना लागु राहतील.  

शासननिर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

202306232003596201 pdf
शासननिर्णय

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now