E Pik Pahani 2024 | पिकविमा,नुकसान भरपाई हवी? तर करा पीकपेरा नोंदणी !

e pik pahani 2024 1 1

e pik pahani 2024: ई-पीक नोंदणी- आता मोबाइल ऍपवर सुविधा उपलब्ध मागील तीन वर्षांपासून ई- पीक नोंदणीची सुविधा उपलब्ध झालेली असून, यंदाही १ ऑगस्टपासून ई- पीकपेरा नोंदणीला सुरुवात होणार आहे. महसूल विभागाचा e pik pahani 2024 हा प्रकल्प १७ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे. ई-पीक पाहणी ऍपच्या माध्यमातून मागील तीन वर्षांत रब्बी व खरीप हंगामात शेतकन्यांनी पिकांची नोंद केली होती. ई- पीक पाहाणी वर्जन- 2.0.11 या मोबाईल ऍपवरून पीकपेरा नोंद करता येतो. यंदा १ ऑगस्टपासून ई-पीकपेरा नोंदणी सुरू होणार आहे. पीकविमा, पीककर्ज व इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारावर पीकपेरा नोंद असणे आवश्यक आहे पीकपेरा नोंद न केल्यास पीकविमा यासह इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचण येऊ शकते.

e pik pahani 2024 साठी कोठे कराल नोंदणी?

e pik pahani 1 1

ऑनलाईन पद्धतीने ई- पीकपेरा नोंदणी करता येणार आहे. यासाठी मोबाईलवर प्ले स्टोअरमधून e pik pahani ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे.

Table of Contents

ऍपवर कशी कराल नोंदणी?

ऍप डाऊनलोड झाल्यानंतर स्वतःचा जिल्हा, तालुका, गाव निवडावे. त्यानतर खातेदार किंवा गट क्रमांक टाकावा. शेतीचे क्षेत्र, हंगाम, पीक आदींचा पर्याय निवडावा.

एक ऑगस्ट २०२४ पासून करा पीक पेरा नोंदणी

राज्यात १ ऑगस्टपासून पीकपेरा नोंदणी सुरू होणार आहे. ऍपवरून ही नोंदणी करता येणार आहे. मोबाईल ऍपवरून हि नोंदणी १ ऑगस्ट २०२४ पासून e pik pahani 2024 मोबाईल ऍप देखील सुरू होणार आहे.

पीकविमा, नुकसानभरपाई हवी असेल तर ई-पीकपेरा नोंदणी आवश्यक आहे. त्याशिवाय भरपाई मिळत नाही.

ई-पीकपेरा नोंदणी १ ऑगस्ट २०२४ पासून होणार आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now