![Free Computer Course | MSCIT व CCC मोफत | ७ वी ते १२ वी पास मुलींसाठी अर्ज भरणे सुरु. 2 1693315581995](https://sarkaricorner.in/wp-content/uploads/2023/08/1693315581995-1024x576.jpg)
Free Computer Course महिला व बाल कल्याण विभागाकरिता गट अ योजने अंतर्गत सन २०२३-२४ अंतर्गत ग्रामिण भागातील इयत्ता ७ वी ते १२ वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण मिळावे याकरिता महिला व बाल कल्याण विभागाकरिता गट अ योजने अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या इयत्ता ७ वी ते १२ वी पास मुलींना यावर्षी संगणक प्रशिक्षण शुल्क / फी हि महिला व बाल कल्याण विभागाकरिता गट अ योजने अंतर्गत थेट DBT द्वारे या विद्यार्थ्यांना जमा करण्यात येणार असून त्या करिता इयत्ता ७ वी ते १२ वी पास मुलींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपरोक्त संदर्भाकित विषयान्वये महिला व बाल कल्याण विभागाकरिता गट अ योजने अंतर्गत सन २०२३-२४ अंतर्गत ग्रामिण भागातील इयत्ता ७ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना Free Computer Course संगणक प्रशिक्षण देणे बाबत योजनेच्या अर्जाचे नमुने पुढील कार्यवाहीस्तव आपणाकडे पाठविण्यांत येत आहेत.
सदर योजने बाबत आपले स्तरावरुन ग्रामिण स्तरावर व्यापक प्रचार व प्रसिध्दी देऊन Free Computer Course संगणक प्रशिक्षणजनजागृती करण्यांत यावी. तसेच अर्जातील अटी व शर्तीचे अनुषंगाने लाभार्थ्याकडुन वरील प्रमाणे योजनेचे अचुक अर्ज दि.३१.०८.२०२३ पर्यंत स्विकारण्यांत यावे.
तरच मिळेल शिष्यवृत्ती पहा संपूर्ण माहिती
Free Computer Course संगणक प्रशिक्षण अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहेत.
१. अर्जदाराचे आधारकार्डची छायाप्रत सोबत जोडण्यांत यावी..
२. वार्षीक उत्पन्न रु १,२०,०००/- आतील असल्याचा सक्षम प्राधिका-याचा दाखला सोबत जोडणे आवश्यक आहे.
३. इयत्ता ७ वी ते १२ वी मध्ये शिकत असल्याबाबत मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा शाळेचा, विद्यालयाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
४. संगणक कोर्सला ऑनलाईन परिक्षा फॉर्म भरल्याचे प्रवेश घेतल्याची पावती आवश्यक आहे.
५. सन २०२३-२४ या वर्षात Free Computer Course संगणक प्रशिक्षणास संस्थेचे प्रवेश घेतल्याचे / पास झाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र जोडावे. ६. अपंग लाभार्थी असल्यास अपंगत्वाबाबतचे अधिकृत प्रमाण पत्र (किमान ४०% किवा त्या पेक्षा जास्त )
७. आधार कार्डशी जोडणी केलेल्या KYC केलेल्या व खाते सुरु असलेल्या अदयावत बँक पुस्तकाची छायांकीत प्रत जोडणेआवश्यक आहे.
८. अर्जदार लाभार्थी हा अकोला जिल्हातीलच रहीवासी असावा. लाभार्थ्याने सन २०२३-२४ या वर्षात Free Computer Course समकक्ष असणारे प्रशिक्षण पुर्ण केलेले असावे.
MSCIT व CCC संगणक प्रशिक्षण बाबत अर्ज नमुना डाऊनलोड करण्याकरिता ग्रुप जॉईन करा अथवा कमेंट्स करा.