जिल्ह्यात सुरु असलेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात ग्रामिण भागातील अत्यंत गरजू व्यक्तींसाठी Gharkul Yojana 2023, करिता ६०० घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरु झाली असुन, शबरी आवास योजनेंतर्गत या लाभार्थ्यांकडून जिल्ह्याचा लक्षांक पुर्ण करण्याकरिता ग्रामिण भागातील अत्यंत गरजू लाभार्थ्यानकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Gharkul Yojana : जिल्ह्यात ६०० घरकुलांना मंजुरी, शबरी आवास योजनेंतर्गत ग्रामिण भागातील अत्यंत गरजू लाभार्थींना एक लाख 20 हजार तसेच MREGS अंतर्गत बांधकाम करण्याची मजुरी देण्यात येत असुन. ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे. आदिवासी अनुसूचित जमातीच्या ज्या लाभार्थींना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत किंवा जे अनुसूचित जमातीचे लाभार्थी कच्च्या कुळा-मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये, अथवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवार्यात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थींना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी राज्य शासनामार्फत राबवली जाते. आणि त्या आर्थिक वर्षात प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टानुसार लाभार्थ्यांची निवड करून घरकुलाचा लाभ दिला जातो. मागील आर्थिक वर्षात मिळालेल्या घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच चालु आर्थिक वर्षात जिल्ह्याला ६०० घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे.त्यामुळे जिल्ह्यातीत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना Gharkul Yojana घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.
कोणती कागदपत्रे लागणार?
- आधार कार्ड
- जॉबकार्ड
- राशन कार्ड
- घराचा नमुना ८ अ
- तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला
- जातीचा दाखला
- आधार संलघ्न बँक पासबुक
- १०० रु. च्या स्टॅम पेपरवर प्रतिज्ञापत्र
- कच्या घराचा फोटो
या योजनेसाठी कुठे अर्ज करायचा?
- ग्रामपंचायत कार्यालय
- पंचायत समिती कार्यालय
- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय
या योजनेसाठी प्राधान्य कुणाला?
- अपंग
- महिला
आदिम जमातीच्या व पारदि जमतीच्या लाभार्थ्यांना