How to Add Nominee in 7/12 : घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर वारसाची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज उरली नाही. सातबारा उताऱ्यावर वारसा नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. एक ऑगस्टपासून जिल्ह्यात भूमिअभिलेख विभागाच्या तालुकास्तरावरील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या सातबारा उताऱ्यावर वारसा नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
How to Add Nominee in 7/12, वारस नोंदवा ऑनलाइन
सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद करण्यासाठी नागरिकांना यापूर्वी संबंधित तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागत होता. सातबारा उताऱ्यावरील वारसा नोंदीसाठी आता कार्यालयात जाण्याची गरज राहिली नसून, त्यासाठी केवळ भूमिअभिलेख विभागाकडे ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
एक ऑगस्टपासून सुविधा सुरु
सातबारा उताऱ्यावरील वारसा नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा भूमिअभिलेख विभागाच्या जिल्ह्यात सातही तालुकास्तरावर उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात सुरु करण्यात आली आहे.
वारस ऑनलाइन नोंदविण्यासाठी हे करा How to Add Nominee in 7/12 !
सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे ऑनलाइन नोंदविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.ऑनलाइन अर्ज करताना ‘ई-मेल पत्ता, मोबाइल क्रमांक व संबंधित कागदपत्रे सादर करावयाची आहेत.सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा जिल्ह्यात भूमिअभिलेख कार्यालयामार्फत एक ऑगस्टपासून तालुकास्तरावरील How to Add Nominee in 7/12 उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात सुरु करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्जाची पडताळणी केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद केली जात आहे.अशी माहिती जिल्हा अधीक्षक, आशा जाधव भूमिअभिलेख विभाग, अकोला,
नविन स्वस्त धान्य दुकान घेण्यासाठी अर्ज सुरू
या तारखेच्या आधी करा अर्ज