Maharashtra ITI Admission 2023 – Centralized Online Admission Process | अशीराहील ITI ची ऑनलाई नप्रवेश प्रक्रिया

81 / 100
Maharashtra ITI Admission 2023 1

Maharashtra ITI Admission 2023 : ऑगस्ट २०२३ साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील प्रमाणे राबविण्यात येणार असुन ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवाराने सदर सुचनांचा अवलंब करणे आवश्यक आहे. राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत ऑगस्ट २०२३ प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया  Centralized Online Admission Process पद्धतीने करण्यात येत असुन प्रवेशाची सव्विस्तर माहिती आपण या पोस्टद्वारे जाणुन घेणार आहोत. प्रवेश पद्धत, नियमावली व प्रमाणित कार्यपद्धत हे दिनांक : १२ जुन २०२३ पासुन सुरु करण्यात आलेली आहे.

Maharashtra ITI Admission 2023 राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये Maharashtra ITI Admission 2023 दि : १२ जुन २०२३ पासुन रोज सकाळी १० ते ११ या वेळेत निशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. तरी सदर सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे. प्रवेश पद्धती,नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक आणि तदनुषंगिक काही शंका असल्यास जवळच्या शासकीय किंवा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संपर्क साधावा. अथवा संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षात प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते ६ या वेळेत संपर्क साधावा.

अशी असेल अर्ज करण्याची पद्धत :- Maharashtra ITI Admission 2023

  • राज्यातील सर्व शासकीय व खासगीऔद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रियेत सहभागी असुन सर्व संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असणार आहेत. अर्ज स्वीकृती केंद्रावर उमेदवारांचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे,पळताडणी करणे, स्वीकृती आणि निश्चिती करणार आहेत.
  • Maharashtra ITI Admission 2023 उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा.
  • अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येईल. सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
  • प्रवेश अर्जात  Primary Mobile Number प्राथमिक मोबाईल नंबर नोंदविणे अनिवार्य केले आहे. एका मोबाईल क्रमांकावर फक्त एकाच अर्ज नोंदणी करता येणार आहे. संपुर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS द्वारे माहिती व OTP कळवण्यात येईल. सबब उमेदवाराने आपला मोबाईल अद्यावत मोबाईल क्रमांक आपल्या प्रवेश अर्जात Primary Mobile Number प्राथमिक मोबाईल नंबर म्हणुन नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिया पुर्ण होईपर्येंत बदलता येणार नाही.
  • ओनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे खाते (Admission Account) त्यांचा नोंदणी क्रमांक  (Registration Number) हाच User ID म्हणुन तयार होईल.
  • उमेदवाराने Maharashtra ITI Admission 2023 त्यांच्या प्रवेश खात्यात प्रवेश Login करून Admission Activities हे ऑप्शन निवडून Application Form वर क्लिक करून संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा. प्रवेश अर्जात सादर केलेली सर्व माहिती योग्य असल्याची पुन्हा खात्री करावी. आणि प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेतवेच्या माध्यमातुन भरावे.
  • Maharashtra ITI Admission 2023 प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर प्रवेश अर्ज निश्चित करण्यापुर्वी  उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येईल.
  • प्रवेश शुल्क : राखीव संवर्ग – १०० रुपये, अराखीव संवर्ग – १५०
  • उमेदवाराने संपुर्ण प्रवेश अर्ज व प्रवेश शुल्क भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची Provisional Application Form छापील प्रत प्रिंटआउट घ्यावी.
  • प्रवेश अर्ज निश्चित करणे (Confirmation)
  • Maharashtra ITI Admission 2023 प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहिती, आवश्यक मूळ कागदपत्रे, तसेच झेरॉक्स प्रत, स्वतःचा फोटो, तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पळताडणीसाठी सादर करावे. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रा ची यादी Download या वर क्लिक करा. उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
  • अर्ज स्वीकृती केंद्रामधील अधिकारी हे उमेदवाराने अर्जात नमुद केलेली माहितीची उमेदवाराने सादर केलेल्या दस्तऐवाजावरून काळजीपूर्वक तपासणी करतील. आवश्यक असल्यास उमेदवारास योग्य ते बदल सूचना देतील, तपासणी नंतर अर्जाची निश्चितीकरण करून, उमेदवारास अर्ज निश्चितीकरण पावती Application Confirmation Slip व निश्चित केलेल्या अर्जाची Confirmed Application Form प्रत देतील.
  • अर्ज स्वीकृती केंद्रामध्ये अधिकारी अर्ज पडताळणी व प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास सर्व मूळ दस्तऐवज  / कागदपत्रे परत करतील
  • उमेदवारास अर्ज निश्चित करण्यासाठी औद्योगिक संस्थेस कोणतेही शुल्क देय नाही.
  • प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर औ.प्र.संस्था मूळ दस्तऐवज / कागदपत्रे परत करीत नसल्यास अथवा प्रवेश निश्चित करण्यासाठी शुल्क आकारत असल्यास उमेदवाराने त्वरित मदत कक्षास संपर्क साधावा.
  • निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाचाच सर्व प्रवेशफेऱ्यांकरिता विचार करण्यात येईल.       निश्चित न केलेले अर्ज प्राप्तच झाले नाहीत असे समजण्यात येईल.
  • प्रवेश अर्ज निश्चित केल्यवर उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येणार नाही. तसेच उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर हरकती नोंदविणे या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश Login करून तसा बदल करता येणार आहे. त्यानंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.
  • Maharashtra ITI Admission 2023 प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय प्रकल्प व प्राधान्य सदर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक Registration Number व पासवर्ड द्वारे Login करून Submit/Change Option/Preferences द्वारे सादर करावे.
  • पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य पुर्ण भरल्यानंतर Option Form ची छापिल प्रत Print Out घ्यावी.
  • उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज बाद (रद्द) होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चुकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल. व उमेदवार संपुर्ण प्रवेश प्रक्रियेतून बाद होईल.
  • अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी देखील दि. १२ जुन २०२३ पासुनच प्रवेश अर्ज व चौथ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र (Allotment Latter) ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी आपल्या अकाऊंटला लॉगीन करून निवडपत्राची प्रिंट घेऊन निवड झालेल्या औ.प्र.संस्थेत प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे.उमेदवारांना निवडपत्राची (Allotment Latter) ची छापील प्रत (printout) ज्या संस्थेत त्याची निवड झाली त्या संस्थेत देखील घेता येईल.
  • उमेदवाराने त्यास बहाल करण्यात आलेल्या जागेस प्रवेश निश्चत करतांना प्रवेश अर्जातील दाव्याच्या पुष्ठयर्थ आवश्यक दस्तऐवज/ कागदपत्रे संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज कागदपत्राची यादी या लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करावी. तसेच माहिती पुस्तिका येथे प्रपत्र ३ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रवेश निश्चितीच्या वेळेस आवश्यक दस्तावेज / कागदपत्रे सादर करू न शकल्यास किंवा माहितीत तफावत आढळल्यास उमेदवारास बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील फेऱ्यांतुन बाद करण्यात येईल.

-: प्रवेशाचे वेळापत्रक :-

-: प्रवेशाचे वेळापत्रक :-
#

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now