Pm Awas Yojana Gramin | प्रधानमंत्री आवास योजना 2023 | यामुळे रखडले घरकुलांचे बांधकाम

Pm Awas Yojana Gramin 1

घरकुल मंजूर; पण जागेचा वांधा; बांधकाम करणार कसे?

Pm Awas Yojana Gramin अंतर्गत जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वी २ हजार ४० लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले, मात्र लाभार्थ्यांकडे स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने घरकुलाचे बांधकाम सुरू करणार तरी कसे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जागेअभावी संबंधित लाभाय्यांच्या घरकुलांची बांधकामे अद्याप रखडल्याचे वास्तव आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत गरीब कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. त्यामध्ये घरकुल मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी चार टप्प्यांत १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते, त्यानुसार जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपूर्वी जानेवारी २०२३ मध्ये घरकुल मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी २ हजार ४० लाभार्थ्याकडे घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागाच नाही. स्वतःच्या नावे जागेचा नमुना ८ नसल्याने घरकुल मंजूर असले तरी, जागेचा वांधा असल्याने मंजूर घरकुलाचे बांधकाम कुठे आणि कसे करणार, याबाबतचा प्रश्न जिल्ह्यातील २ हजार ४० हजार लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थ्यांकडून घरकुलांचे बांधकाम अद्याप सुरू करण्यात आले नाही, त्यानुषंगाने जागेअभावी जिल्ह्यात रखडलेली घरकुलांची बांधकामे मार्गी लागणार ४० तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अनुदानाचा लाभही मिळेना !

Pm Awas Yojana Gramin घरकुल बांधकामासाठी स्वतःच्या नावे जागा असल्याचा नमुना ८ अ सादर केला नसल्याने जिल्ह्यात घरकुल मंजूर असलेल्या २ हजार ४० लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम अद्याप सुरू करता येऊ शकले नाही. त्यामुळे मिळणारे अनुदानही मिळाले नाही.

जागेचा नमुना ८ कसा मिळणार?

Pm Awas Yojana Gramin संबंधित काही लाभार्थी वडिलोपार्जित जागेत राहत असल्याने तसेच काही लाभार्थी ई क्लास व एफ क्लास जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याने त्यांना जागेचा नमुना ८ त्यांच्या नावे मिळणार कसा, असा प्रश्न आहे.

Pm Awas Yojana Gramin घरकुल मंजूर असले तरी जागेचा नमुना ८ नसल्याने जिल्ह्यात २ हजार ४० लाभाथ्यांच्या घरकुलाची कामे रखडली आहेत. त्यामुळे वडिलोपार्जित जागेत राहणाऱ्या लाभार्थ्यांती घरकुल बांधकामासाठी आपसातील सहमतीने जागेचा नमुना ८ स्वतःच्या नावे करणे गरजेचे आहे. असे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, बी. वैष्णवी, जिल्हा परिषद, आकोला यांनी सांगितले.
अशी आहेत रखडलेली Pm Awas Yojana Gramin घरकुले !
अकोला – १९१
अकोट – १२२
बाळापुर – १३२
बार्शीटाकळी – ४९२
पातूर – १८२

हे वाचा

Table of Contents

इयत्ता 9 वी साठी ७५००० हजार रुपये व इयत्ता 11 वी साठी १२५००० हजार रुपये विद्यार्थ्यांना शासन देणार शिष्यवृत्ती

या तारखेच्या करा ऑनलाईन अर्ज

https://sarkaricorner.in/pm-yasasvi-yojana-2023-young-achievers-scholarship-award-scheme/

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now