pm kusum scheme पी एम कुसुम टप्पा -२ मध्ये ज्या लाभार्थ्यांकडून अतिरीक्त स्वरुपात ऑनलाईन पद्धतीने कट झालेली रक्कम (लाभार्थी हिस्सा) महाऊर्जाच्या मार्फत आता अशा लाभार्थ्यांना सदर अतिरीक्त परत करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत, करीता संबंधित लाभार्थ्यांनी खालील पद्धतीने अर्ज करावेत.
pm kusum scheme कुसुम टप्पा – २ अंतर्गत माहे मे २०२२ पासून ज्या लाभार्थ्यांनी तांत्रिक चुका व अन्य कारणांमुळे त्यांचा लाभार्थी हिस्सा दुबार व अधिक वेळा महाउर्जा च्या खात्यावर जमा केला आहे, अशा लाभार्थ्यांनी खालील दिलेल्या मागणी अर्जामध्ये परिपूर्ण भरून महाऊर्जा च्या ac@mahaurja.com या ईमेल आयडीवर मागणी अर्ज पाठवायचा आहे.
सोबतच्या नमुना अर्जामध्ये व स्वयं साक्षांकित बँक खाते विवरण प्राप्त झाल्यानंतर एक महिन्याच्या आत पडताळणी करून दुबार व अधिक वेळा जमा रकमा अर्जामध्ये नमुद संबंधित बँक खात्यावर परत करण्यात येईल.
आपण नमुद केलेल्या बँक खात्यामध्ये सदर रकमा खर्ची पडल्या आहेत. यांच्या पुराव्यासह या नोंदी असलेले स्वयं साक्षांकित बँक विवरण अर्जासोबत जोडायचे आहेत.
वरील माहिती अचूक असून, महाऊर्जास अतिरिक्त प्राप्त झालेल्या माझ्या लाभार्थी हिश्याची रक्कम महाऊर्जा कडून पडताळणीअंती वरील नमूद खात्यावर जमा केल्यास ती मला प्राप्त होईल असे मी प्रमाणित करीत आहे.
अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्याकरीता खालिल दिलेल्या लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा. आणि अर्जाच्या pdf साठी कमेंट करा.