Pm Modi Awas Yojana | ओ. बी.सी.प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार आता 10 लाख नविन घरकुल

pm modi awas yojana

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील (OBC) लाभार्थ्यांसाठी pm modi awas yojana राबविण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.त्याअनुषंगाने सदर योजनेच्या अनुषंगाने वितरीत करण्यात येणारा निधी खर्च करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी घोषित करण्यात आली आहे.

शासन निर्णय जाहीर :-

pm modi awas yojana – सन २०२३-२४ च्या अर्थ संकल्पीय भाषणामध्ये मा. उपमुख्यमंत्री (वित्त मंत्री महोदयांनी यांनी दि.०९ मार्च, २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ करीताचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना अर्थसंकल्पातील परिच्छेद क्र. ७४ मध्ये ” इतर मागासवगीय लाभार्थ्यासाठी येत्या तीन वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी नवीन “मोदी आवास” घरकुल योजना सुरु करण्यात येईल. या योजनेसाठी येत्या ३ वर्षात १२ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येतील. यापैकी ३ लाख घरे ३ हजार ६०० कोटी रुपये खर्च करुन सन २०२३- २४ या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी येत्या तीन वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी “मोदी आवास घरकुल योजना राबविण्याबाबतचा मंत्रीमंडळ प्रस्ताव मा. मंत्रीमंडळापुढे दि.२१.०७.२०२३ रोजी सादर केला असता सदर प्रस्तावास मान्यता दिली आहे व त्यानुषंगाने दि.२८.०७.२०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

०२. सदर योजना नविन असून pm modi awas yojana या योजनेची अंमलबजावणी, संनियंत्रण व समन्वय ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण या यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे.” तसेच, या योजनेअंतर्गत आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद इतर मागास बहूजन कल्याण विभागामार्फत अर्थसंकल्पित करण्यात येणार आहे.

०३. pm modi awas yojana साठी आवश्यक निधी ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण यांस उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने निधीची तरतुद करण्यासाठी शासन निर्णय क्र – २०२३/प्र.क्र.४३ / योजना-५, दि. १०.०७.२०२३ अन्वये नवीन लेखाशीर्ष उघडण्यात आले आहे. सदर लेखाशीर्षातील pm modi awas yojana घरकुल योजना राबविण्याच्या अनुषंगाने उपलब्ध करुन दिलेला निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव (योजना-५), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी व संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे.

Table of Contents

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now