Talathi Bharti 2023-खुशखबर । ४६४४ पदांसाठी अधिकृत जाहिरात झाली प्रसिध्द | २६ जून पासून ऑनलाईन अर्ज सुरू

talathi bharti 2023

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत, Talathi Bharti 2023 तलाठी गट-क संवर्गातील एकूण ४६४४ पदांसाठी सरळसेवा भरती करीता अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्र राज्यातील एकूण ३६ जिल्ह्याच्या केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येणार आहे. आणि दिनांक २६ जून पासून ऑनलाईन अर्ज भरणे सुरू होणार आहेत.

Talathi Bharti 2023: करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, सदर भरती करिता अटी व शर्ती, शैक्षणिक पात्रता, जिल्हानिहाय पदे, प्रवर्गनिहाय आरक्षण पदे, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरूप,कागदपत्रे,परीक्षा शुल्क, मार्गदर्शक सुचनेनुसार तरतुदी करण्यात आल्या आहेत.

  • अटी व शर्ती :-

 Talathi Bharti 2023 करिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. व त्याच्याकडे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificat) , जन्मदाखला

Table of Contents

(Birth Certificate) व महाराष्ट्रात १५ वर्षाआधी पासूनचा रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र असावे.

  • शैक्षणिक पात्रता :-  

अधिसूचनेनुसार उमेदवार हा कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. तसेच संगणक व माहिती तंत्रज्ञान विषेयक परीक्षा उत्तीर्ण असावा,व त्यास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, आणि माध्यमिक शालांतपरीक्षेत मराठी/हिंदी उत्तीर्ण असावा.

  • अशी असतील जिल्हानिहाय एकूण पदे :-
अ.क्र.जिल्हाएकूण रिक्त पदे
 संभाजी नगर (औरंगाबाद)१६१
 जालना११८
 परभणी१०५
 हिंगोली७६
 नांदेड११९
 बीड१८७
 लातुर६३
 उस्मानाबाद११०
 नागपूर१७७
 वर्धा७८
 भंडारा६७
 गोंदिया६०
 चंद्रपूर१६७
 गडचिरोली१५८
 अमरावती५६
 आकोला४१
 वाशिम१९
 बुलढाणा४९
 यवतमाळ१२३
 पुणे३८३
 सातारा१५३
 सांगली९८
 सोलापूर१९७
 कोल्हापूर१५६
 नाशिक२६८
 धुळे२०५
 नंदूरबार५४
 जळगाव२०८
 अहमदनगर२५०
 मुंबई शहर१९
 मुंबई उपनगर४३
 ठाणे६५
 पालघर१४२
 रायगड२४१
 रत्नागिरी१८५
 सिंधुदुर्ग१४३
 एकूण जिल्हे – ३६एकूण पदे – ४६४४
वनरक्षक भरती 2023 ऑनलाईन अर्ज सुरु
  • प्रवर्गनिहाय आरक्षण पदे :-

पद संख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

  • आरक्षण :-

खेळाडू,दिव्यांग,अनाथ,माजी सैनिक,प्रकल्पग्रस्त,भूकंपग्रस्त,पदवीधर अंशकालीन कर्मचारी, पडताळणी अंती प्राप्त होणाऱ्या अहवालाच्या आधारे सदर प्रवर्गातील उमेदवारांना Talathi Bharti 2023 करिता नियुक्ती आदेश बाबतची कार्यवाही करण्यात येईल.

  • वयोमर्यादा :-
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी वयोमर्यादा किमान १८ पेक्षा कमी व ३८ पेक्षा जास्त नसावी.
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी वयोमर्यादा किमान १८ पेक्षा कमी व ४३ पेक्षा जास्त नसावी.
  • पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा कमाल ५५ वर्ष राहील.
  • खेळाडूची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन सदर पात्रतेसाठी विहित वयोमर्यादेत ५ वर्षपर्येंत वयाची अट राहील, उच्चतम वयोमर्यादा ४३ इतकी राहील.
  • दिव्यांगांसाठी वयोमर्यादा सरसकट ४५ इतकी राहील.
  • प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल ४५ इतकी राहील.

माजी सैनिक उमेदवारांसाठी सुद्धा वयोमर्यादा कमाल ४५ वर्ष एवढी राहील.

Talathi Bharti 2023 करिता परीक्षेचे स्वरूप :-

t2

Talathi Bharti 2023 साठी लागणारे कागदपत्रे :-

Talathi Bharti 2023 साठी परीक्षा शुल्क :-

ऑनलाईन फोर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now